Slide #1 image

President

Hon'ble Smt. Suryakantatai Patil ,
President , Marathwada Gramin Shikshan Sanstha
&
Ex. Union Minister of Rural Development.

Slide 2 image

Secretary

Hon'ble Dr.Devendra Joshi ,
Secretary , Marathwada Gramin Shikshan Sanstha

Slide 2 image

Principal

Dr.Ujjwala K. Sadavarte ,
Principal , Hutatma Jaywantrao Patil Mahavidyalaya
Himayatnagar

Slide 2 image

राष्ट्रीय चर्चासत्र

मराठी विभाग
भटक्या विमुक्त जमातींचे साहित्य : स्वरूप आणि दिशा
22 & 23 Feb. 2017
Hutatma Jaywantrao Patil Mahavidyalaya
Himayatnagar

Slide 2 image

क्रीडा स्पर्धा

क्रीडा विभाग
आंतरमहाविद्यालयीन सी. झोन वेट लिफ्टिंग , पॊवर लिफ्टिंग व शरीर सौष्ठव स्पर्धा
22 & 23 Feb. 2017
Hutatma Jaywantrao Patil Mahavidyalaya
Himayatnagar

Slide 2 image

राष्ट्रीय सेवा योजना

जनजागरण व प्रशिक्षण
कॅशलेस व्यवहार - मोबाईल बँकिंग
28 & 29 Sept. 2017
Hutatma Jaywantrao Patil Mahavidyalaya
Himayatnagar

Slide 2 image

क्रीडा स्पर्धा

क्रीडा विभाग
सी झोन मैदानी क्रीडा स्पर्धा
28 & 29 Sept. 2017
Hutatma Jaywantrao Patil Mahavidyalaya
Himayatnagar

NextPrev


Hutatma Jaywantrao Patil Mahavidyalaya , Himayatnagar


Introduction
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत उच्च शिक्षण संकल्पना अतिशय महत्वाची ठरत आहे . माहिती व तंत्रज्ञानाचा प्रचंड विकास झाल्यामुळे सर्वच पातळीवर या ज्ञानाचा सर्रास वापर होत आहे. यास आपले महाविदयालय अपवाद राहू शकत नाही . विशेष म्हणजे आपल्या महाविद्यालयास विद्यापीठाची कायम मान्यता (संलग्नीकरण ) असून त्याचबरोबर यु. जी . सी. च्या ACT १९५६ नुसार महाविद्यालयास २(F) १२(B) ची मान्यता मिळाली आहे यामुळे महाविद्यालय यु.जी.सी. दिल्ली च्या अनुदानास पात्र झाले आहे. या मुळे महाविद्यालायाचा विविध अंगी विकास होण्यास मदत होत आहे.

उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पहाणे ही मानवी मनाची सहज प्रेरणा आहे . उद्याच्या सुंदरतेची जडणघडण आजच्या प्रयत्नामुळे सिद्ध होत असते . महाविदयालय आपल्या यशस्वी वाटचालीतून महान विभूतींचा उच्च शिक्षणाचा वारसा जबाबदारीने जोपासत आहे.

महाविद्यालयीन शिक्षणाचा हा काळ विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील व्यक्तिमत्वाच्या जडण-घडणीसाठी एक महत्वपूर्ण वळण आहे. म्हणूनच हे महाविदयालय शैक्षणिक जबाबदारी बरोबरच कला, क्रीडा, संगणक ,पर्यावरण , राष्ट्रीय सेवा योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम राबवत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासेतर विविध उपक्रमाद्वारे अनेकविध संधी उपलब्ध करून गुणात्मक दर्जा वाढीसाठी सदैव प्रयत्नशील असे हे महाविदयालय विद्यार्थी केंद्रित आहे . भविष्यात कदाचित हे सर्व करण्याची संधी आपल्या पाल्यास मिळणार नाही. म्हणून याच क्षणी पालकांनी जागरूक राहून आग्रहपूर्वक याच महाविद्यालयात प्रवेश घेऊन विद्यार्थिनीच्या व विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देण्याचे कार्य करण्याची संधी आम्हाला द्यावी

मा. अध्यक्षा श्रीमती सूर्यकांताताई पाटील यांच्या प्रयत्नाने महाविद्यालय प्रगती करत आहे. यापुढेही आपण मा. ताईच्या अपेक्षेप्रमाणे महाविद्यालय विकसित करू यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.

यापुढेही अनेक योजना अनेक संकल्प आहेत यासाठी आपणा सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. शैक्षणिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्याना सक्षम बनवणे हे महाविद्यालयाचे उद्दिष्ट आहे . हे साध्य करण्यासाठी पालक या नात्याने आपले, आमच्या व्यवस्थापनाचे , प्राध्यापक , कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे वेळोवेळी विशेष सहकार्य लाभत आहे . प्रगतीचे शिखर गाठणारे गतिमान असे हे महाविदयालय ठरावे हाच आमुचा संकल्प.